RSS

*कांचन पगारेचा रंगेल अंदाज*

04 Mar

जाहिराती, मालिका, चित्रपट या माध्यमांतून आपल्या अभिनयाची चमक दाखवणारा चतुरस्त्र अभिनेता कांचन पगारे याचा रंगेल अंदाज नुकताच समोर आला आहे. कांचनने नेमकं काय केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच ? त्याचा हा रंगेल अंदाज आगामी ‘इमेल फिमेल’ या चित्रपटासाठी आहे.

आयुष्य म्हणजे ‘खाओ पिओ ऐश करो’ असं मानत पार्ट्या करीत अय्याशी करणाऱ्या विकीची भूमिका कांचन साकारत आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना कांचन सांगतो कि, ‘मस्तमौला बेफिकीर इतरांना अडचणीत आणणारी विकीची ही व्यक्तिरेखा असून या भूमिकेचा लूक, अंदाज खूप रंजक आहे’. वेगळी भूमिका साकारण्याची इच्छा ‘इमेल फिमेल’ च्या निमित्ताने मिळाली असून यातील माझा अतरंगीपणा प्रेक्षकांना नक्की आवडेल. सोशल माध्यमामुळे आपण सर्वांशी एका क्लिकवर जोडले जात आहोत. चुकून अथवा जाणीपूर्वक काही चुकीच्या गोष्टी शेअर किंवा पोस्ट झाल्या तर त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? हे मनोरंजकरित्या दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. २० मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘इमेल फिमेल’ या चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.

निखिल रत्नपारखी, विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्राजक्ता शिंदे, सुनील गोडबोले, कमलेश सावंत, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या ‘इमेल फिमेल’ चित्रपटात भूमिका आहेत. चित्रपटाची पटकथा भक्ती जाधव यांची आहे. संवाद भक्ती आणि योगेश जाधव यांनी लिहिले आहेत. छायांकन मयुरेश जोशी तर कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वेशभूषा सुहास गवते आणि देवयानी काळे यांची आहे. कार्यकारी निर्माते स्वप्नील वेंगुर्लेकर आहेत. निर्मिती सल्लागार अविनाश परबाळे आहेत.

 
Comments Off on *कांचन पगारेचा रंगेल अंदाज*

Posted by on March 4, 2020 in Uncategorized

 

Comments are closed.

 
%d bloggers like this: